Mahabhumi Bhulekh

Check Digital Satbara Mutation Status And Property Card Application Status


जर तुम्ही जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर फेरफार अर्ज केला असेल (वारस नोंदणी) तर त्याची स्थिती तसेच Property Card Application Status महाभूमी पोर्टलवर ऑनलाइन पाहता येते.


ऑनलाइन ७/१२ फेरफार अर्ज स्थिती तपासण्याची प्रक्रिया:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
  • होम पेज वर 7/12 Mutation Application Status या पर्यायावर क्लिक करावे लागेल./li>
  • आता तुम्हाला तुमच्या ७/१२ फेरफार ची स्थिती तपासण्यासाठी २ पर्याय दिसतील
    1. फेरफार क्रमांक नुसार
    2. नोंदणी क्रमांक नुसार

1. फेरफार क्रमांक नुसार ७/१२ फेरफार अर्ज स्थिती तपासण्याची प्रक्रिया

  • तुम्हाला फेरफार क्रमांक नुसार (By Mutation Number) या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गाव, फेरफार क्रमांक, कॅप्टचा कोड टाकून Search या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

by mutation number

  • आता तुमच्यासमोर फेरफार ची स्थिती तक्ता दिसेल त्यामध्ये सर्वे नंबर /गट नंबर वर क्लिक करून तुमच्या ७/१२ अर्जाची स्थिती तपासू शकता.

mutation status
7 12 mutation application status

नोंद: फेरफार नोदी संबंधी हरकत घेणे बाबतचा अंतिम दिनांक फेरफार क्रमांक निहाय दाखविलेला आहे. सदर दिनांकापूर्वी फेरफार संबंधी हरकत (असल्यास) ती संबंधित गावाच्या तलाठी कार्यालयासच पोहोच करणे आवश्यक राहील. कोणत्याही इतर वरीष्ठ महसूल कार्यालयास सदर तक्रार हरकतीच्या दिनांक पर्यंत पाठविल्यास तिचा विचार केला जाणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी.


२. नोंदणी क्रमांक नुसार ७/१२ फेरफार अर्ज स्थिती तपासण्याची प्रक्रिया:

  • तुम्हाला नोंदणी क्रमांक नुसार (By Document Number) या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, नोंदणी कार्यालय, Document Number, Year, गाव, कॅप्टचा कोड टाकून Search या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

by document number

  • आता तुमच्यासमोर फेरफार ची स्थिती तक्ता दिसेल त्यामध्ये सर्वे नंबर /गट नंबर वर क्लिक करून तुमच्या ७/१२ अर्जाची स्थिती तपासू शकता.

mutation status
7 12 mutation application status

प्रॉपर्टी कार्ड अर्जाची स्थिती जाणून घेण्याची पद्धत:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
  • होम पेज वर PR Card Application Status या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी कार्ड च्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी २ पर्याय दिसतील.
  1. अर्ज क्रमांक नुसार (By Inward Number)
  2. नोंदणी क्रमांक नुसार (By Document Number)

1. अर्ज क्रमांक नुसार प्रॉपर्टी कार्ड अर्जाची स्थिती तपासण्याची पद्धत

  • तुम्हाला अर्ज क्रमांक नुसार (By Inward Number) या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला अर्ज आवक क्रमांक टाकायचा आहे आणि कॅप्टचा कोड टाकून Submit बटनावर क्लिक करायचे आहे.

Property card by inward number

  • आता तुमच्या समोर तुमच्या प्रॉपर्टी कार्ड अर्ज स्थिती ची संपूर्ण माहिती मिळेल.

2. नोंदणी क्रमांक नुसार प्रॉपर्टी कार्ड अर्जाची स्थिती तपासण्याची पद्धत:

  • तुम्हाला नोंदणी क्रमांक नुसार (By Document Number) या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला विचारलेली सर्व माहिती जसे कि तुमचा जिल्हा, नोंदणी कार्यालय, Document Number , वर्ष आणि कॅप्टचा कोड टाकून Submit बटनावर क्लिक करायचे आहे.

Property card by document number

  • आता तुमच्या समोर तुमच्या प्रॉपर्टी कार्ड अर्ज स्थिती ची संपूर्ण माहिती मिळेल.

शासनाचे अधिकृत पोर्टल येथे क्लिक करा

© 2026 All Rights Reserved